रिसेल या संस्थेमार्फत समाजात सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२२ हा पुण्यातील अग्रेसर इंटेरिअरस डिझाईनर म्हणून गेली दोन दशके स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे यशस्वी उद्योजक श्री. संपत म्हस्के यांना देऊन गौरविण्यात आले. उद्योजिका व आघाडीच्या अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कोरोना काळातील त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेत त्यांना या पूर्वीही समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सन इंटेरिअर ने आपल्या सेवेच्या अन विश्वासाच्या माध्यमातून घरगुती इंटेरिअर डिझाईन व अनेक प्रोजेक्टमधून हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळविले आहे. २०१३ मध्ये सन इंटेरिअरस, पुणेला प्राईड ऑफ डिझाईन व २०११ मध्ये सामजिक कार्यासाठी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आजवर सन इंटेरिअरस पुणेने वृक्षारोपण व रक्तदान यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवत आपले अनमोल योगदान दिले आहे.
सन इंटेरिअरचे उद्योजक श्री. संपत म्हस्के यांनी " पुरस्कार हे आपल्या कामाला प्रोत्साहन देण्याचे एक माध्यम आहे.आमच्या उद्योग समूहाचे हे यश आहे. उद्योजक म्हणून अधिक जबाबदारी वाढली आहे. यापुढेही सन इंटेरिअरस, पुणे आपल्या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक जोमाने सेवा देत राहील व सामाजिक कार्य वेगाने चालू राहील" असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पुरस्कार मिळाल्याने उद्योग क्षेत्रातून उद्योजक श्री. संपत म्हस्के यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments